Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
केशायुर्वेद ‘पांडव’ गायत्री

डॉ. गायत्री पांडव. प्रॅक्टिस साधारणपणे 1996 पासून करतात. सुरुवातीला मुंबईमध्ये स्वतःचे बस्तान मांडणे तितके सोपे नसल्याने पती एमडी (आयुर्वेद) असूनही त्यांनी जनरल प्रॅक्टिसला प्राधान्य दिले. आई-वडील दोघेही बीएड कॉलेजला प्राचार्य असल्याने लहानपणासूनच शैक्षणिक वातावरण घरात होते. खूप अभ्यास करण्याची आवड आणि सतत कोणत्यातरी नवीन गोष्टीचा ध्यास! लहानपणापासून डॉक्टर होऊन कुठेतरी संशोधन करण्याची त्यांच्या मनात इच्छा होती. त्या इच्छापूर्तीसाठी खूप अभ्यास केला. पण एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही. नाराज मनाने बीएएमएसला प्रवेश घेऊन ‘डिस्टिंक्शन’मध्ये पूर्ण केले.
डॉ. कोहलीच्या हाताखाली आयुर्वेद शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विविश क्लिनिक ट्रायलमध्ये भाग घेतला. त्यातून खूप शिकायला मिळाले. पण पोदार महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर तसा आयुर्वेदाचा अभ्यास केला नाही. जनरल प्रॅक्टिस करताना कधी आयुर्वेदीक औषधे द्यायची वेळ आली, तर ती संधी सोडली नाही. त्यातूनच आयुर्वेदिक पंचकर्म आणि ब्युटी थेरपीजवर थोडा प्रकाश टाकला. आम्ही डॉ. पांडवज् आयुर्स्पाचे उद्घाटन आयुर्वेदातील नामंकित गुरु वैद्य प्रशांत सुरु यांच्या हस्ते केले. वैद्य सुरु यांच्याकडून पंचभौतिक चिकित्सेचे बाळकडू मिळत होते. डॉ. पांडवज् आर्युस्पा आणि ब्युटी सेंटरची प्रगती होत गेली.
फेसबुकवर डॉ. हरीश पाटणकरांची केसांची समस्येवरील उपाय अशा अर्थाची पोस्ट पाहिली. ‘भारतातील पहिले हेअर टेस्टिंग लॅब सेंटर’ असे वाचून आकर्षित झाले. डॉ. हरीशना त्यापूर्वी त्यांनी बारामती येथील गुरुकुलविषयी विचारले होते. भेटीबाबत विचारले असता, ‘चालेल या की भेटायला’ असे उत्तर आल्याने आणखीनच प्रभावित झाले आणि केशायुर्वेद संकल्पनेची खूप माहिती न घेता केशायुर्वेदशी आम्ही जोडले गेलो, असे डॉ. गायत्री सांगतात. आमच्या पांडवज् आयुर्स्पा आणि ब्युटी थेरपी सेंटरला हेअर ट्रिटमेंटची जोड मिळेल, या विचाराने आम्ही केशायुर्वेदमध्ये प्रवेश केला. तेव्हा हा एक खजिना असल्याची आमची भावना झाली.
ही संकल्पना अतिशय सुंदर, शास्त्रोक्त जोड असणारी आणि दस्तावेज असणारी आहे. एका छोट्याशा केसाचे त्रिदोषक, सप्तधातू आणि पंचमहाभूतांशी जोड घातलेले हे मॉडेल आहे. मॉर्डन अॅनाटॉमी आणि त्रिदोषांचा मिलाफ पाटणकरांनी शास्त्रोक्त पद्धतीने जोडले आहे. एका वेगळ्याच ध्येयाने झपाटल्यासारखे डॉ. हरीश यांच्यासोबत कामाला लागलो आणि म्हणता म्हणता नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईसह भारतात शंभरीचा टप्पा ओलांडला, याचाही आनंद आहे. केशायुर्वेदची संकल्पना सर्वांना समजावून सांगताना त्याचे वेगळेपण आम्ही सांगत असतो. केशायुर्वेद हे एक कुटुंब आहे आणि आपण त्याचा एक भाग आहोत, याचा आनंद वाटत असल्याचे डॉ. गायत्री नमूद करतात.
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलच्या त्या सदस्या आहेत. 2018 मध्ये त्यांच्या पुढाकारातून ‘लायन्स क्ल्ब ऑफ डिव्हाईन अँगल’ची स्थापना झाली. लायन्समध्ये त्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन गायनॅक, पेडियाट्रिक कॅन्सर अशा पदांवर काम करताहेत. डॉ. गायत्री आणि त्यांनी स्थापलेल्या क्लबला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना आई-बाबा आणि आजोबांकडून मिळाले. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काही देणे लागतो. ते पूर्ण व्हावे या भावतेतूनच त्या सामाजिक कार्य करत आहेत.
केशायुर्वेदशी जोडल्या गेल्यावर त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील प्रॅक्टिस बर्याच प्रमाणात वाढली आहे. लोकांचा प्रतिसाद वाढला असून, आयुर्वेदाचा लोकांवर पडणारा प्रभाव आहे. जे शास्त्र आपल्या पूर्वजांनी जगले ते परत अनुभवताना सर्व लोकांना आनंद होतो. प्रत्यक्ष केसांचा आणि त्रिदोष, पंचहाभूत संबंध जेव्हा केशायुर्वेदच्या केश नोंदींमधून दाखवून देतो तेव्हा त्यांचा विश्वास बसतो, असे त्या सांगतात. केशायुर्वेदने एक व्यासपीठ दिले आहे. आयुर्वेदाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे आयुर्वेद जगण्याची संधी दिली आहे. जेव्हा केशायुर्वेदचे नाव निघते, तेव्हा स्वतःचे नाव घेतले निघते, याचाही अभिमान वाटतो. केशायुर्वेद हे भविष्यात खूप मोठे एकमेव आयुर्वेदीय हेअर टेस्टिंगचे स्थान असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांती आहे. आयुर्वेद ही शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठीची एक गुरुकिल्ली आहे. भविष्यात आयुर्वेद आणि  योग हे सगळ्यांच्या जगण्याचा भाग होणार हे नक्की.
केशायुर्वेदला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. गायत्री फेसबुकचा अधिक वापर करतात. जिथे जातील तिथे त्याविषयी बोलतात. मागच्या वर्षी युरोपला फिरायला गेले, त्यावेळी आम्ही केशायुर्वेदच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. केशायुर्वेद युरोपला पोहचले. युरोपमध्ये नेदरलँड येथे केशायुर्वेदची शाखा सुरु झाली. आनंद गगनात मावेना, केशायुर्वेदच्या प्रगतीच्या प्रत्येक पायरीवर वैद्य पाटणकरांना मदत करत केशायुर्वेदला सर्वोच्च ठिकाणी पोहचवण्याचा आमचा मानस आहे, असे त्या नमूद करतात. त्यांच्या योगदानाची दखल म्हणून त्यांना ‘केशायुर्वेद भूषण’ हा पुरस्कार मिळाला. त्याने अजूनच जबाबदारी वाढल्याचे त्या समजतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक मार्गदर्शक, वाटाड्याची गरज असते आणि डॉ. गायत्री यांना वैद्य पाटणकरांच्या रुपात तो मिळाला आहे, याचा त्यांना आनंद आहे. वैद्य पाटणकरांविषयी भावना व्यक्त करताना गायत्री म्हणतात,
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा !

Organization Detail

नाव : डॉ. गायत्री किशोर कुलकर्णी-पांडव
शिक्षण  : बीएएमएस
क्लिनिकचे नाव : डॉ. पांडवज् वेलनेस क्लिनिक अॅन्ड डॉ. पांडवज् आयुस्पा
पत्ता : ‘एकता’ शिवधम कॉम्प्लेक्स, ओबेरॉय मॉलजवळ, मालाड (ई), मुंबई-97.
मोबाइल : 9594799797
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 1998 पासून
केशायुर्वेदशी संलग्नित : 2017 पासून

Our Specialities

1. One stop solution for all your hair and skin problem.

2. Accurate diagnosis and perfect treatment.

3. Complete Scalp Analysis , Photography , Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient ) and HP (Hair Prakruti ) analysis.

4. Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s , Cosmetologist’s , Trichologist’s.

5. Wide range of hair and skin care herbal products.
About